July 19, 2024
Home » राज्यस्तरीय वेट लिफ्टिंग शालेय स्पर्धेत अनुष्का धनंजय पाटील उमटवला ठसा..

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : ऑर्किड टेक्नो स्कूलची विद्यार्थीनी अनुष्का धनंजय पाटील हीने मुंबई- ठाणे येथे झालेल्या राज्यस्तरीय वेट लिफ्टिंग शालेय स्पर्धेत ८१ किलो वजन गटात अत्यंत अटीतटीच्या सामन्यात तृतीय क्रमांक पटकावला. बजाजनगरमधील ऑर्किड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनसमधील विद्यार्थी हे स्पर्धा परी‌‌क्षे बरोबर क्रीडा, NEET, JEE-(Main/Advance), NTSE, MTSE Scholarship, डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा, Javahar Navodaya Exam अशा अनेक स्पर्धेत ठसा उमटवत आहेत.
विद्यार्थीनीच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. श्रीनिवास नंदमुरी, मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकवृंदानी तसेच पालक यांनी अभिनंदन करत, पुढील वाटचालीसाठी शुभेछ्या दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!