July 23, 2024
Home » दबंग अधिकारी पोलीस उपायुक्त बगाटे यांची पुन्हा कारवाई; कुटनखाण्यावर कारवाई करुन ४ आरोपींना अटक…

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गॅस रिफिलिंग, अवैध दारू साठा या कारवाईनंतर पोलीस उपायुक्तानी आज दि २५ रोजी सायंकाळी पुन्हा एका कुंटनखाण्यावर धाड टाकून कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार होटल साई कृपा तिरंगा चौक पंढरपूर येथे दोन महिलांना वेश्यागमन व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करुन त्यांना ग्राहकांसोबत वेश्यागमनानसाठी जागा उपलब्ध करुन कुंटनखाना सुरु असल्याची माहिती उपायुक्त बगाटे यांना मिळाली, स्थानिक पोलिसांच्या मदतीने कुटनखाण्यावर धाड टाकण्यात आली. यामध्ये आरोपी निलेश सुभाष पवार ( रा जातवा ता फुलब्री), रवी काळे, शुभम कैलास जंगले ( रा चिंचोली ता फुलब्री) व ग्राहक लक्ष्मण राजेश गावंडे (रा वारंगाफाटा ता कलामनुरी हिंगोली, हमु रांजणगाव ) यांच्या विरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. या एकूण ६५ हजार ९३० रू चा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. ही कारवाई मा.पोलीस आयुक्त सो, मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ-1, श्री नितीन बगाटे, मा.सहा.पोलीस आयुक्त छावणी विभाग श्री महेंद्र देशमुख यांचे मार्गदर्शना खाली पोलीस ठाणे MIDC वाळुज येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अविनाश आघाव, श्री गणेश ताठे, पोउपनि श्री आशोक इंगोले, सफौ. आशोक जाधव, पोलीस नाईक नवाब शेख, राजाभाऊ कोल्हे, विक्रम वाघ, महिला पोलीस हवलदार रेखा चाँद, यांनी केली.

——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!