July 20, 2024
Home » छायाचित्रकार संतोष काळे यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली; कारण अस्पष्ट

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगमध्ये राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि १३ रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. संतोष रामदास काळे वय ४२, साई रेजन्सी सोसायटी, रा सिडको वाळूज महानगर १ छात्रपती संभाजीनगर. ( मूळ गाव अन्वा ता भोकरदन ) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार संतोष काळे हे छायाचित्रकार असून बजाजनगरमध्ये कालसंगम आर्ट गॅलरी नावाने दुकान आहे, दिवाळीचा सण असल्याने दिवसभर दुकानात होते दुकानाचे काम करून रात्री आल्यानंतर सोसायटीमध्ये सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, पती कविता (३४), मुलगा कल्पक (१०) व काळे यांनी नेहमीप्रमाणे जेवण करून झोपले सकाळी पत्नी कविता यांनी ८:४५ वाजेच्या दरम्यान बेडरुमचा दरवाजा वाजवला परंतु कोणताही प्रतिसाद येत नसल्याने त्यांनी खिडकीमध्ये डोकाऊन बघितले असता यांना काळे यांनी गळफास घेतल्याचे दिसले. आरडा ओरड झाल्याने शेजाऱ्यांनी तात्काळ घटनेची माहिती पोलिसांनी दिली, घायनस्थळी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे यांच्यासह पोलीस आमलदार यांनी धाव घेत मृतदेह खाली उतरवून शासकीय दवाखान्यात दाखल केला असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. काळे हयांच्या चांगल्या स्वभावामुळे वाळूज महानगरातील बऱ्याच लोकांच्या परिचयाचे असल्याने बातमी वाऱ्यासारखी पसरवली त्यामुळे अंतिम दर्शन घेण्यासाठी बरीच गर्दी जमली होती.

नव्या वहीत लिहून ठेवला देवाण घेवाणचा हिशेब..
दिवाळीला लक्ष्मीपूजनासाठी आणलेल्या कोऱ्या वहीमध्ये जून हिशेब, कुणाचे किती पैसे द्यायचे आणि कुणाकडून किती घ्यायचे असा हिशोब बाजूला असलेल्या वहीमध्ये लिहून ठेवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!