July 23, 2024
Home » कुत्र्याच्या डोक्यात लोखंडी पाईप मारून खून; वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : मोठभाई नावाच्या लॅबराडॉग कुत्र्याच्या डोक्यात लोखंडी पाईप डोक्यात मारुन जीवे ठार मारल्याची घटना एस एस क्लब जवळील एका फॉर्म हाऊस वर आज दि ११ रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.

बद्री कोंडीबा बारबैले वय 52 वर्ष धंदा- शेतमजुरी रा. लांबखाना ता. जि. छत्रपती संभाजीनगर ४.मु. बाबाभाई यांचे फार्महाऊस ए एस क्लब जवळ गट नं. 118, तिसगांव ता. जि. छत्रपती संभाजीनगर,हे 14 वर्षा पासून कुटुंबासह राहतात व फार्म हाऊस वर मालक फारुख कमला गौरी ( बाबाभाई ) यांनी एक लैबराडॉग (नाव मोठाभाई) वय 8 वर्ष, रंग पांढरा हा पाळीव कुत्रा पाळला होता, सलीम सय्यद हा सुध्दा फार्महाऊसवर ईलेक्ट्रीशनचे काम करतो. आज दि ११ रोजी सकाळी साडेनऊ वाजत पत्नी संगीता बद्री बारवैले, जाहेदखान गुलाबखान पटेल, रा. देवळाई खाजानगर, असे आम्ही मौजे तिसगांव गट नं. 118, बाबाभाई यांचे फार्महाऊस ए एस क्लब जवळ ता. जि. छत्रपती संभाजीनगर येथील फार्महाऊसवर आमचे काम करत असतांना त्या ठिकाणी सलीम सय्यद वय 55 वर्ष व्यवसाय ईलेक्ट्रीशन, रा. बीड बायपास, दरम्याजवळ, कब्रस्थान जवळ छत्रपती संभाजीनगर हा सकाळी आला. तेव्हा फार्म हाऊस मधील लॅबराडॉग ( नाव मोठाभाई) हा त्या ठिकाणी फिरत होता. तेव्हा त्याचे अंगावरील केस येथे पडतात असे म्हणून सलीम हा त्या कुत्र्यावर चिडला, त्याने हातात लोखंडी पाईप घेवून कुत्र्याच्या डोक्यात मारला, त्या मुळे कुत्र्याच्या डोक्यात मार लागल्याने तो जागीच मृत्यु पावला. ही माहिती मालक फारुख कमला गौरी, ( बाबाभाई) व त्यांचा मुलगा मोहम्मद फहाद गौरी यांना देण्यासाठी त्यांचे ड्राव्हर दिलीप दामोधर गंगावणे यांचे फोनवर 10.30 वाजता माझे फोन करून फोन करून माहिती दिली, तेव्हा तुम्ही माझी माहिती मालकाला का सांगीतली असे म्हणून त्याने फिर्यादी व त्याच्या पत्नीला शिवीगाळ करुन धक्का बुक्की करून जिवे मारण्याची धमकी देवून सय्यद सलीम हा तिथून पळून गेला. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पथरकर हे करीत आहे.

———

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!