July 26, 2024
Home » सिडको वाळूज महानगरात भरदिवसा घरफोडी ; रोख रक्कमेसह लाखोंचे दागिने लंपास, नागरिकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )-

वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगर एक मधील सारा वृंदावन येथे भरदिवस घरफोडी करुन रोख रक्कमेसह लाखोंचे दागिने लंपास केल्याची घटना आज दिनांक ९ रोजी दु ४ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार सुरेश बाबुलाल सोनवणे सारा वृंदावन प्लाट नंबर ५ मध्ये दोन महिन्यापासून कुटुंबासह राहतात. सोनवणे हे एका खाजगी कंपनीमध्ये कामगार असून आज सकाळी ते नेहमीप्रमाणे कंपनीत गेले. पत्नी सीमा ह्या दुपारी १२ वाजेच्या दरम्यान बँकेत कमानिमित्त दरवाजा बंद करुन गेल्या. बँकेतील काम करुन ४ वाजेच्या सुमारास घरी आल्यानंतर त्यांना दरवाजा उघडा दिसला त्यांनी शेजारी विचारूस करून घरात जाऊन बघितले असता त्यांना घरात समान अस्तव्यस्त पडलेले दिसले, त्यांनी तात्काळ पतीला फोन करुन घरी बोलावले घरातील ठेवलेली मंदिरासाठी जपून ठेवलेले ४५ हजार रू. कंपनीतून मिळालेला बोनस व पगार ५० हजार रू असा एकूण ९५ हजार रू रोख व घरातील १.५ तोळ्याचे गंठन, २ तोळ्याच्या दोन अंगठ्या, ७ ग्रॅमचे कानातील झुंबर, २ ग्रामची नथ, २ ग्रॅम मुलाच्या कानातील, मिलांच्या २ ग्रामच्या दोन अंगठ्या, ओम आणि मोरनी २.५ ग्रॅम, असे एकूण ५ तोळे सोन्याचे दागिने व ९५ हजार कॅश चोरी गेल्याचे सुरेश सोनवणे यांनी सांगितले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलीस तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करुन चोरट्यांचा शोध घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!