July 19, 2024
Home » कासोडा ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिंदे गटाचे वर्चस्वएकता ग्रामविकास पॅनलचे ७ पैकी ६ उमेदवार विजयी


न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –
वाळूज महानगर : अत्यंत चुरशीची समजल्या जाणाºया कासोडा ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा निकाल सोमवारी (दि़६) जाहीर झाला़ यात पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाच्या एकता ग्रामविकास पॅनलचे ७ पैकी ६ उमेदवार विजयी झाले तर महाविकास आघाडी एकता ग्रामविकास पॅनला एका जागेवर समाधान मानावे लागले़ यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्याची अतिषबाजी मिरवणूक काढण्यात आली़
२०२१ मध्ये कासोडा ग्रामपंचयात निवडणूक झाली होती़ त्यावेळी एकता ग्रामविकास पॅनलचे ९ पैकी ८ जण विजयी झाले होते़ सरपंचपदी मंजुषा संदीप मनोरे तर उपसरपंचपदी राधाबाई किसन गुंढाळे यांची निवड झाली होती़ मात्र १९ डिसेंबर २०२२ मध्ये ९ पैकी ६ सदस्यांचा सरपंच व उपसरपंचांसोबत मतभेद झाल्याने राजीनामा दिला होता तर एका सदस्यास सरकारी नोकरी लागल्याने त्यानेही राजीनामा दिला होता़ रविवारी (दि़५) ७ जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली़ सोमवारी सकाळी गंगापूर तहसील कार्यालयात मतमोजणी झाली़ यात शिंदे गटाच्या एकता ग्रामविकास पॅनलचे संदीप गुलचंद मनोरे, अनिल साहेबराव हिवाळे, कल्पना पिराजी देवबोने, नितीन कैलास देवबोने, कैलास देवराव दाभाडे या तर कल्पना पिराजी देवबोने या दोन जागी विजयी झाले तर महाविकास आघाडी एकता ग्रामविकास पॅनलच्या झुंबरबाई भागचंद देवबोने या एकमेव उमेदवार विजयी झाल्या़ तर गोविंद धोत्रे, सुमनबाई कडु देवबोने, अनिल गोंविद धोत्रे, बद्रिनाथ रामचंद्र नवले, राजु दणके, विजय नवनाथ शिनगारे, ज्योति अनिल धोत्रे, रंजनाबाई शिवाजी वैद्य हे उमेदवार पराभूत झाले़ यावेळी सरपंच मंजुषा मनोरे, उपसरपंच राधाबाई गुंढाळे यांनी मतदारांचे आभार मानले़ यावेळी माजी उपसरपंच विलास हिवाळे, बाबासाहेब पिठले, कल्याण हिवाळे, दत्तु हिवाळे, चंदु चामे, जनार्धन गुंढाळे, एकनाथ दाभाडे, ज्ञानेश्वर हिवाळे, गणेश मनोरे, शिवाजी वरकड, विठ्ठल दरेकर, राजु धोत्रे, ज्ञानेश्वर देवबोने, संताराम नवले, भाऊसाहेब मते, गणेश गिरबानो, त्र्यंबक देवबाने, त्र्यंबक बोचरे, नानासाहेब शेळके, सदाशिव जाधव, विलास गायकवाड, भरत गुंढाळे यांची उपस्थिती होती़

पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा माजी सभापती दिलीपसिंग राजपुत, तालुका प्रमुख दिलीप निरफळ यांचया मागदर्शनाखाली आम्ही निवडणुक लढविली़ मी जनतेचे आभार मानतो. आम्ही तीन वर्षीत गावात केल्या कामाची पावती पोटनिवडणुकीत आम्हाला मिळाली आहे़ गावाच्या विकासाठी व अडीअडचणी सोडविण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहु
सारंगधर जाधव (एकता ग्रामविकास पॅनल प्रमुख ).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!