July 26, 2024
Home » भुजबळांच्या ‘करेंगे या मरेंगे’ला, जरांगेंचं ‘लड़ेंगे भी और जीतेंगे भी’ ने उत्तर; दोन्ही नेते आक्रमक

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

छत्रपती सांभाजीनगर : मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच मंत्री छगन भुजबळ यांच्या संभाषणाची एक कथित ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. ज्यात, “आपण आता करेंगे या मरेंगे हेच करायला पाहिजे आणि आवाज द्यायला पाहिजे. असंही मरतंय आणि तसंही मरतंय, असे भुजबळ म्हणाले असल्याचे डाव केला जात आहे. त्यावर मनोज जरांगे यांनी उत्तर दिले आहे. भुजबळ काय म्हणाले माहित नाही, पण आमचं ‘लड़ेंगे भी और जीतेंगे भी’ असे ठरलं असल्याचं जरांगे म्हणाले आहे.

छगन भुजबळ यांची ऑडीओ क्लिपवर बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, “करेंगे या मरेंगे असे म्हणणे त्यांचा प्रश्न आहे. पण आमचं म्हणणे आहे की, ‘लड़ेंगे भी और जीतेंगे भी’ असे जरांगे म्हणाले. तर, आम्हाला अजून आरक्षण मिळालेच नाही, अजून लढा सुरु आहे. आम्ही आमच्या हक्काचे मागत असून, कोणावर अतिक्रमण करत नाही. कोण काय बोलत आहे, त्याकडे आता लक्ष न देण्याचे आम्ही ठरवले असल्याचे जरांगे म्हणाले आहे.

भुजबळ यांच्या वक्तव्याला विजय वडेट्टीवार यांनी पाठींबा दिला असल्याच्या प्रश्नाला देखील जरांगे यांनी उत्तर दिले आहे. वडेट्टीवार हे सर्वांनाच पाठींबा देत असतात, आम्हाला देखील त्यांच्या पाठींबा आहे. ओबीसी बांधवांच्या व्यथा देखील आम्ही जाणून घेतल्या आहेत. त्यांनी देखील आमची व्यथा जाणून घेतल्या आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावे अशी भूमिका ओबीसी बांधवांची गावागावात असल्याचं देखील जरांगे म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!