July 23, 2024
Home » फटाका सेलन्सर लाऊन मोठमोठ्याने आवाज करणाऱ्या दुचाकी स्वारांवर वाळूज एमआयडीसी पोलिसांची कारवाई

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : बाजाजनगर व परिसरात शाळा महाविदयालयाच्या समोर मोठ्या कर्कश आवाजाचे सायलन्सर, हॉर्न वाजवत मोटर सायकल फेऱ्या मारणाऱ्या तरूणांवर वाळूज एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करून गुन्हे दाखल केले असून आशा नियम बाह्य बदल करून मोठ मोठ्याने सेलन्सर वाजवून नागरिकांना त्रास देणाऱ्या तरूणांवर पोलिसांची नजर असणार आहे. 

पोलीस ठाणे एमआयडीसी  वाळुज हद्दीतील शाळा महाविदयालयाच्या समोर मोठ्या कर्कश आवाजाचे सायलन्सर, हॉर्न वाजवत मोटर सायकल फेऱ्या मारणारे तरूनांच्या ञासापासून शाळेतील, व महाविद्दलयातील मुलींना ञास होवूनये म्हणून साध्या गणवेशा मध्ये तसेच गणवेशा मधील पोलीसांच्या फेऱ्या वाढवल्या असून असे कर्कश हॉर्न, व मोठ्या आवाजाचे नियमबाह्य सालन्सर बसवणारे तरूनावर तसेच विनाकारण महाविद्दालय परिसरामध्ये फरणारे मुलांनावर कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार, दामीनीपथक यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अविनाश आघावा, यांनी आदेश दिले होते.  दि  4 रोजी विशेष तपास पथकाचे सपोनि गौतम वावळे, पोउपनि दिपक रोठे, व त्यांचे सोबतचे पथकातील अंमलदार पोना/ धिरज काबलीये, हनुमान ठोके, सुरेश भिसे, यशवंत गोबाडे, यांनी साध्या गणवेशामध्ये  दगडोजीराव देशमुख कॉलेज बजाजनगर येथे विनाकारण कर्कश हॉर्न, व मोठ्या आवाजाचे साससयलन्सर  वापरणाऱ्या दुचाकी चालकावरे इसम  अजय रतन जाधव, हा त्याच्या ताब्यातील विना नंबर प्लेट, यामाहा आर 1-5 MH20DL- 4333, तसेच समीर अब्बास शेख यांच्या ताब्यातील बजाज पल्सर 125, मॉडीफाय केलेली फटाका सायलेन्सर, कर्कश हॉर्न मेकनिक चेमदतीने काढून जमा केले व कंपनीचे बसवून MH20GH-3486 या वाहनावर वाहतूक शाखेचे पोलिस अंमलदार 1158 राहुल काकडे यांच्या मदतीने कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई या पुढे सुरूच  चालू ठेवण्यात येणार असून ज्या दुचाकी मालकाने त्याचे दुचाकीला मॉडीफाय केलेली फटाका सायलेन्सर, कर्कश हॉर्न, बसवले असतील त्यांनी ते तात्काळ काढून घ्यावेत, अन्यथा आपणास पोलीस कारवाईला सामोरे जावे लागेल. असे अवाहान वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी केले आहे.आहे.

——-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!