July 22, 2024
Home » मराठा आरक्षणासाठी तिसगावच्या उपसरपंचाचा राजीनामा

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा
वाळुज महानगर/ अनिकेत घोडके

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील दुसऱ्यांदा आमरण उपोषणाला बसले आहे. तसेच चौंडी येथील ठिकाणी धनगर आरक्षणाच्या उपोषणाला मागणीसाठी बसलेल्या आंदोलनस्थळी जाऊन जाहीर पाठिंबा देऊन समर्थन दिले.

या दोन्ही समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठींबा देण्यासाठी तिसगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच नागेश कुठारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
त्यांनी जरांगे पाटील यांची सोमवारी अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी भेट घेतली यावेळी त्यांनी ही घोषणा केली. याप्रसंगी प्रविण हांडे, तेजस बढ़े, शितल गंगवाल, नरेंद्रसिंग यादव, प्रताप भवर, जगदीश उगले, रमेश कंठाळी, गणेश जगताप, ज्ञानेश्वर मागे, दत्ता जाधव, दरपनकर साताप्पा, महेश वाघ यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!