July 26, 2024
Home » मराठ्यांचा अंत पाहू नका, अन्यथा …साकळी उपोषणकर्ते आक्रमक

न्युज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : मराठा समाजास आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली येथे उपोषणास बसले आहे. दिवसेंदिवस त्यांची प्रकुर्ती खालावत असल्याने उपोषणकर्ते आक्रमक झाले आहे. जरांगे यांच्या समर्थनार्थ रविवारी दि २९ रोजी सजापूर गट नंबर मधील क्रांती नगरमध्ये येथे सकल मराठा समाजाकडून साकळी उपोषण सुरू केले आहे. यावेळी आदिनाथ भुमे, हरिभाऊ बुरंगे, बाबासाहेब जाधव, दादासाहेब गडगुळ, समाधान जगताप, रामप्राद शिंदे, रामेश्वर भागस, ऐश्वर्या भुमे, सत्यशीला बुरंगे, वर्षा कवरखे, स्वाती तायडे, उज्वला पाटील हे उपस्थित होते,
मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने पुढील आंदोलनाची दिशा ठरल्यास साखळी आंदोलनाचे रूपांतर हे आमरण उपोषणात होईल. असेही असेही आंदोलनकर्ते म्हणाले याप्रसंगी सकल मराठा समाजाच्या वतीने एक मराठा, लाख मराठा. अशा घोषणा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!