July 19, 2024
Home » हिसकावलेला मोबाईल परत मिळाला नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद …वाळूज एमआयडीसी पोलिसांकडून हरवलेले व हिसकावून नेलेले मोबाइल नागरिकांना परत

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : वाळूज महानगरातील विविध परिसरातील विविध ठिकाणाहून हिसकावलेले व हरवलेले मोबाईले वाळूज एमआयडीसी पोलिसांकडून नागतिकांना पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या हस्ते आज दि २६ रोजी परत करण्यात आले. आपला मोबाइल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहे.

वाळूज परिसरात मागील काही दिवसात मोबाईल हिसकावण्याचे प्रमाण वाढले होते, त्या अनुषंगाने काही गुन्हे वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखले करण्यात आले होते, तपासामध्ये एकूण १०० मोबाईल हस्तगत करण्यात आले असून आज नागरिकांना परत करण्यात आले आहे. यावेळी पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, पोलीस निरीक्षक अविनाश अघाव, अशोक ताठे, सहायक पोलीस निरीक्षक गौतम वावळे, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, दीपक रोठे, सचिन पागोटे, सचिन डाके, गणेश गिरी, शिवाजी घोरपडे, सचिन पागोटे व पोलीस ठाणे एमआयडीसी वाळूज येथील संपुर्ण पोलीस अंमलदार हे उपस्थित होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!