July 23, 2024
Home » महिलांमधील शूर्पनखा वृत्तीचे पत्नी पीडित पुरुषांकडून दहन…

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : विजया दशमीच्या दिवशी परंपरेनुसार रावण दहन करण्याची प्रथा खूप वर्षा पासून सुरु आहे ,रावण हा एक महा पंडित होवून गेला परंतु त्यांच्यात असलेल्या वाईट गुणामुळे भगवान श्रीरामाने विजया दशमीच्या दिवशी रावणाचा वध केला. त्या प्रथेला धरून आजही आपण रावणाच्या वाईट वृत्तीचे दहन व्हावे ,तसेच वाईट गोष्ठी व विचार संपुष्टात यावे म्हणून रावनाच्या पुतळ्याचे दहन केल्या जाते. .रावण हा एक पुरुष तसेच महा पंडित महा ज्ञानी होता .व रावणाच्या इतक्या वर्षापासून पुतळ्याचे दहन केल्याने रावणाच्या वाईट वृत्तीचे दहन होते ,तसेच वाईट गोष्टी जाऊन चांगल्या गोष्ठी होतात अशी धारणा आहे .रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यासाठी स्त्रिया तसेच पुरुष देखील हजर राहतात व रावणाच्या पुतळ्याचे दहन करतात.खूप वर्षा पासून सलग रावणाच्या पुतळ्याचे दहन केल्याने जवळ जवळ पुरुषांमधील वाईट गुण ,दुर्गुण हे नष्ठ होत चालले,परंतु स्त्रियांमधील वाईट गुण हे तसेच राहिल्याने त्यात वाढ होताने दिसत आहे. .स्त्री व पुरुष हे आपण समान मानतो तर मग वाईट विचारांचे दहन करत अस्ताने केवळ रावणाच्या पुतळ्याचे तसेच विचारांचे व वृत्तीचे दहन न होता तिथे शूर्पणखा सारख्या वाईट वृत्ती असलेल्या काही स्त्रियांच्या वाईट वृत्तीचे व समाजघातकी वृत्तीचे देखील दहन होणे गरजेचे आहे. बहुतांश स्त्रियांमधील वाईट व विध्वंसक वृत्तीचा त्रास हा वाईट गुण त्यागलेल्या पुरुषांना होत आहे.
ज्या प्रमाणे पुरुषांमधील वाईट ,गुण, दुर्गुण हे संपुष्टात येत आले पाहिजे त्याच प्रमाणे महिलांमधील वाईट वृत्ती ,वाईट गुण ,दुर्गुण ,हे देखील नष्ठ झाले पाहिजे .
रावणाचे वाईट गुण जळावे म्हणून रावण पुतळा दहन केल्या जातो तर रावनाच्या बहिणी मध्ये देखील काही वाईट गुण होते रावणाची बहिण शूर्पणखा हि स्त्री होती व त्यामुळे तिच्यातील दुर्गुणाचे ,वाईट वृत्तीचे देखील दहन होणे गरजेचे आहे. म्हणून विजया दशमीच्या शुभ मुहूर्तावर साला बादा प्रमाणे ह्या वर्षी देखील शूर्पणखा ‘वृत्तीचे’ दहन पत्नी पीडित पुरुष आश्रमाकडून करण्यात आला .स्त्रिया मधील वाईट वृत्तीमुळे बहुतांश संसार उध्वस्त होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे ,स्त्रिया अ,बला होत्या तेव्हा त्यांचे साठी वेग वेगळे कायदे बनवल्या गेले ,स्त्रियांना कोर्टात कोर्ट फी माफ,स्त्रियांना मोफत आरोग्य तपासणी ,स्त्रियाना मोफत बस प्रवास, ३३ टक्के आरक्षण आणि अजून भरपूर काही ,अश्या अनेक सुविधा केल्या गेल्या व आजही केल्या जात आहे .स्त्रिया आता ‘स’ ,बला झाल्या असून खर्या अर्थाने पुरुष ‘अ’बला झाला आहे व पुरुष सबलीकरण करण्याची गरज आहे . स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांवर होणार्‍या अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले आहे. परंतु त्याकडे कुणी लक्ष द्यायला तयार नाही .महिलावर अन्याय अत्याचार झाल्यास त्याचा उदो .उदो केल्या जातो परंतु पुरुषांवर अन्याय झाल्यास त्याना कुणी मदत देखील करत नाही.पोलीस मदत करत नाही ,न्याय व्यवस्था मदत करत नाही समाज पुरुषांवर अत्याचार होतो हे जाहीर पने मान्य करायला तयार नाही .म्हणून आज पुरुष हतबल झाला असून नाविलाजाने आत्महत्तेचा अवलंब करताने दिसत आहे .एन .सी .आर .बी.च्या रेकोर्ड नुसार पुरुष आत्महत्तेचे प्रमाण स्त्री अत्महत्ते पेक्षा जवळ जवळ तीन पट जास्त आहे .केवळ एक तर्फी कायद्या मुळे बहुतांश सुखी संसार मोडल्या जात आहे, व तुटलेल्या संसारामुळे येणार्‍या पिढीवर देखील परिणाम होण्याची भीती समोर आली आहे. ज्या व्यक्तीचा संसार तुटू लागला त्याची कर्तव्य दक्षता कमी होते,परिणामी देशाच्या दर डोई उत्पन्नावर देखील याचा परिणाम होतो .
म्हणून पुरुषांच्या बाजूने देखील कायदे बनल्या गेले पाहिजे ,पुरुषांसाठी स्वतंत्र ‘पुरुष आयोग स्थापन झाला .पाहिजे ,प्रत्तेक पोलीस ठाण्यात लाय डिटेक्टर बसवल्या गेले पाहिजे, पुरुष व बाल कल्याण समिती स्थापन झाली पाहिजे .घरगुती हिंसाचारापासून पुरुषांचे संरक्षण अधिनियम लागू झाले पाहिजे.
जवळ जवळ बहुतांश कायदे हे केवळ महिलांच्या बाजूने असलयाने बहुतांश महिला ह्या कायध्याचा दुरुपयोग करतात व पुरुषांवर अन्याय करतात. घरातून हाकलून देतात ,पुरुषांचा काम धंदा जातो,पत्नी आपल्या पतीस त्यांच्या स्वतःच्या मुलांपासून देखील वेगळी करते व त्यामुळे पत्नी पिडीत पुरुषाना ;पत्नी विरह ‘तसेच पुत्र प्रेमापासून देखील वंचित राहावे लागते..न्यायालयात पत्नीने केस दाखल केल्यावर तर काय पती कमावता असो किंवा नसो त्याला त्याच्या पत्नीला पोटगी द्यावीच लागेल असे निवाडे न्यायालय देत आहे . जो व्यक्ती दुर्बल आहे त्यास पोटगी देणे न्यायोचित अस्ताने आजकाल सर्रास महिलांना झुकते माप देऊन पुरुषांना डावलल्या जात असून पुरुषांचे संविधानिक अधिकार तसेच व्यक्ती स्वातंत्र्याचे अधिका देखील हिरावल्या जात आहे,पती पोटगी भरू शकला नाही तर त्याला सर्रास जेल मध्ये टाकण्याची पद्धत सुरु झाली असल्याने बहुतेक होतकरू पत्त्नी पिडीत हे नाहक जेल मध्ये जाताने दिसत आहे. ह्या अघोरी प्रकारामुळे विवाह पद्धत धोक्यात येण्याची शक्यता आहे ,पुरुषांचा विवाहावरचा विश्वास उडत चालाल आहे ,व हे एकतर्फी कायदे असेच राहून कायद्याचा दुरुपयोग करणे थांबले नाही तर पुरुष विवाह करण्यास घाबरतील व पूर्वी स्त्री राज्य होते तसे आज देखील पुरुष राज्य वेगळे व स्त्री राज्य वेगळे असे करण्याची गरज दिसत आहे .पत्नी पिडीताना खर्या अर्थाने आज समजले कि लग्न करणे हा सर्वात मोठा गुन्हा करणे असे आहे कारण लग्न केले कि थोड्याच दिवसात त्याच्या मागे जर केसेस चा मारा झाला ,जसे डी.व्ही सीआरपीसी १२५, आय पी सी ४९८ अ ,३०७ ,३२४,३२६,३२३,३५४,३७६,हिंदू विवाह कायदा कलम ९ ,२४ अश्या एक ना अनेक केस पत्नी आपल्या पतीवर तसेच पतीच्या कुटुंबावर टाकते .व यामुळे पती हतबल होतो. ,परिणामी पतीची तसेच त्याच्या कुटुंबाची कार्यक्षमता घटते ,न्याय व्यवस्थेवर नाहक लोड पडतो व न्याय व्यवस्थेवर लोड पडला कि न्यायची अपेक्षा करणे अवघड होते. म्हणून नवर्या बरोबर भांडण तंटा करून नवर्यावर खोट्या केसेस दाखल करणार्या महिलांची देखील ‘वाईट वृत्ती’ जळून भस्मसात होवो त्याना सद्बुद्धी मिळो यासाठी आज रोजी पत्नी पिडीत पुरुष आश्रमात ,त्यांच्या वाईट वृत्तीचे दहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!