July 23, 2024
Home » काळ्या बाजारात जाणारे रेशनचे धान्य पकडले, दोन जण ताब्यात

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :

छत्रपती संभाजीनगर कडून लासुर स्टेशन कडे एका चार चाकी वाहनातून रेशनचे धान्य काळ्या बाजारात जात असताना वाळुज एमआयडीसी पोलिसांनी मुद्देमाला सह पकडून दोन जणांना ताब्यात घेतले ही कारवाई गुरुवारी दिनांक 19 रोजी सायंकाळी वाळुज परिसरातील साजापूर येथे करण्यात आली

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, काळाबाजार करण्यासाठी रेशनचे धान्य घेऊन चार चाकी वाहन (एम एच 20, डी ई -3169) छत्रपती संभाजीनगरकडून लासुर स्टेशनकडे जात असल्याची गुप्त माहिती वाळूज एमआयडीसी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे वाळुज एमआयडीसी पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर ते लासुर स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावरील साजापूर चौफुली येथे सापळा रचला. त्यानंतर संशयित वाहन येतात पोलिसांनी पाहणी केली असता, त्या चार चाकी वाहनात जवळजवळ वीस गोण्या रेशनचे धान्य आढळून आले. त्यावर सरकारी मोहर असल्याचे दिसून आले. या धान्याबाबत वाहनातील चालक मालकाला विचारणा केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. शिवाय त्यांच्याकडे या धान्याबाबत कोणतेही कागदपत्र मिळून आले नाही. त्यामुळे वाळुज एमआयडीसी पोलिसांनी सदरचे वाहन पोलीस ठाण्यात जमा केले असून दोन जणांना ताब्यात घेतले आहे. किशोर सुराणा आणि केशव राठोड अशी या दोघांची नावे आहेत. धान्याची चौकशी करण्यासाठी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी पुरवठा विभागाशी संपर्क साधला आहे. त्यांच्याकडून येणाऱ्या अहवालानंतरच पुढील कारवाई होणार आहे.

….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!