July 26, 2024
Home » पलटी झालेल्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅकरखाली दबून चालकाचा जागीच मृत्यू

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : संदीप लोखंडे

वाळूज महानगर : वाळू वाहतूक करणाऱ्या विना नंबरच्या ट्रॅकर पालटी होऊन त्याखाली दबलेल्या ट्रॅक्टर ड्रायव्हरच मृत्यू झाल्याची घटना आज दि २१ रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान सिडको गार्डन जवळील पाण्याच्या टाकीजवळ घडली.

नवनाथ विठ्ठल पारशे वय २५ रा खवडा तिसगाव जि छत्रपती संभाजीनगर असे मृत झालेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. अधिक माहिती अशी की, सिडको गार्डन कडून तिसगावकडे जाताना वडगाव येथील पाण्याच्या टाकीजवळ येताच समोर आलेल्या मोठ्या खड्यामध्ये ट्रॅक्टर पलटी झाला, जवळच असलेल्या वीट भाटी कामगारांना आवाज आल्याने त्यांनी ट्रॅक्टर खाली दबलेल्या चालकाला बाहेर काढले परंतु डोक्याला जबर लागल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोठे, गिरी यांनी कारचाऱ्यांसह धाव घेत मृतदेह घाटी दवाखान्यात पाठवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!