July 18, 2024
Home » वडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आशा सेविकांना मोबाईल वाटप…

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर – बजाजनगर ग्रामपंचायतीच्या वतीने मंगळवारी (दि.१७) १५ व्या वित्त आयोग निधी अंतर्गत ग्रामपंचायत हद्दीतील आशा सूपरवाझर, आशा कार्यकर्त्या व सेविकेना शासकीय कामकाज करण्यासाठी मोबाईलचे वाटप करण्यात आले. आशा कार्यकर्त्यांना शासकीय कामकाज करताना मोबाईल अभावी अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेवून सरपंच सुनिल काळे, ग्रामविवकास अधिकारी भिमराव भालेराव यांनी आशा कार्यकर्त्यांना मोबाईल वाटप करण्याचा निर्णय घेतला. ग्रामपंचायतींच्या १५ वित्त आयोग निधीतून मंगळवारी सर्व आशा कार्यकर्त्यांना मोबाईल देण्यात आले. यावेळी सरपंच सुनिल काळे, उप सरपंच ज्योती साळे, ग्रामविकास अधिकारी भिमराव भालेराव, ग्रा.पं. सदस्य उषा हांडे, कमल गरड, सुनिता साळे, छाया प्रधान, माया पाटील, माधुरी सोमास, मंदा भोकरे, सुरेखा लगड, राणी पाटोळे, पुनम भोसले, सागर शिंदे, विष्णु उगले, विजय सरकटे, संभाजी चौधरी, रामदास गवळी, माजी पं.स. सदस्य सतिश पाटील आदींची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!