July 22, 2024
Home » मनोज जरांगे यांचे बंद केलेले फेसबुक अकाउंट चोवीस तासांत सुरु…

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्य सरकारला दिलेली डेडलाइन १४ आॅक्टोबर रोजी संपली. जाहीर केल्याप्रमाणे जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतील १७० एकर जागेवर भव्यदिव्य जाहीर सभा घेतली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून या सभेला लाखोंची गर्दी जमली होती. या सभेला जे उपस्थित राहू शकणार नाहीत, त्यांच्यासाठी जरांगे यांच्या फेसबुक पेजवरून लाइव्ह लिंक व्हायरल करण्यात आली होती.
पण सभा सुरू होण्याच्या दोन तास आधीच मनोज जरांगे पाटील यांचे फेसबुक बंद करण्यात आले होते. जरांगे यांनी स्वतः आपल्या भाषणात याचा उल्लेख केला. जरांगे म्हणाले, राज्य सरकार बिथरलंय त्यांनी माझ फेसबुक अकाउंटच बंद करून टाकलं. पण टीव्ही चॅनल, त्यांनी व्हॅनमधून दाखवलेलं थेट प्रक्षेपण राज्यात, देशात आणि जगात पोहाेचलं ते कसं थांबवणार, असा सवालही जरांगे यांनी सरकारला केला होता.

जरांगे यांच्या सभेला अतिप्रचंड प्रतिसाद मिळाला, सभा संपल्यानंतर गर्दी ओसरायला रात्र झाली. या सभेने राजकारण्यांना धडकी भरवली. अखेर जरांगे यांच्या सभेच्या दोन तास आधी बंद केलेले त्यांचे फेसबुक पेज चोवीस तासांत पुन्हा सुरू करण्यात आले आहे. ज्या लोकांना गर्दीमुळे सभास्थळापर्यंत पोहाेचता आले नाही, त्यांच्यासाठी कालच्या सभेचा व्हिडिओ या पेजवर व्हायरल करण्यात आला आहे. राज्यातील सर्वात मोठी सभा म्हणून जरांगे यांच्या सभेचा उल्लेख केला जातोय. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या ४२ वर्षांच्या काडी पहिलवान असलेल्या जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत राज्यातला सगळा मराठा समाज एकवटून दाखवला. जे राज्यातील एकाही राजकारण्याला आजपर्यंत जमले नाही, ते अंतरवाल सारख्या छोट्या गावातील एका मराठा तरुणाने करून दाखवले.

राजकारण्याकडून झालेले फुटीचे प्रयत्न, आरोप या सगळ्यांना जरांगे पाटील पुरून उरले. फेसबुक पेज बंद करूनही काही साध्य होणार नाही, हे लक्षात आल्यानंतर आज जरांगे यांचे फेसबुक पुन्हा पूर्ववत सुरू झाले आहे. मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत ३५ आंदोलन केलेल्या जरांगे यांचे फेसबुकवर ५५ हजारांहून अधिक फाॅलोअर्स आहेत, तर ५५ हजार जणांनी त्यांच्या पेजला पसंती दर्शवली आहे. अंतरवाली सराटीतील आंदोलनानंतर जरांगे पाटील यांच्या फेसबुक मित्रांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळाले आहे.

….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!