July 20, 2024
Home » राज्यस्तरीय बेस्ट अबॅकस स्पर्धेत बजाजनगरातील पाच विद्यार्थी प्रथम

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

छत्रपती संभाजीनगर : जालना येथे बेस्ट बिट्स अबॅकस तर्फे स्टेट लेवल कॉम्पिटिशन (दि १) घेण्यात आली .या स्पर्धेत राज्यातील ५० शहरातील एक हजार मुलांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये बजाजनगर छत्रपती संभाजीनगर येथील ४२ मुलांनी सहभाग घेतला होता..सदरील स्पर्धा जुनियर लेवल ते ८ लेवल पर्यंत ची होती. या स्पर्धेत बेस्ट अबॅकस बजाजनगर ची ५ मुले प्रथम क्रमांकावर आली तर त्याचा सायकल सर्टिफिकेट मेडल देवून सत्कार करण्यात आला. यामध्ये सानविका नागरे, दीप भुईन, विवेकानंद घोश, सानवी खापरे, शांभवी कुलकर्णी ही मुले राज्यात प्रथम आली. ४ मुले द्वितीय, तृतीय क्रमांकावर उपविजेता झाले. तर १२ मुले टौप १० मध्ये आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जालना जिल्हा परिषदेचे उप शिक्षण अधिकारी श्यामराव देशमुख , जालना पोलीस उप निरीक्षक पुजा कदम व सीए बावकर सर होते. तसेच बेस्ट अबॅकस बजाजनगर च्या संचालिका गीता अजय बारवाल उपस्थित होते. कार्य क्रमाचे आयोजक बेस्ट अबॅकस हेड अरुणा अर्जुन राजपुत हे होते.

.. ——————–

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!