July 26, 2024
Home » स्मार्ट सिटी बसचे काच फोडणाऱ्यावर  एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) – 

वाळूज महानगर : छत्रपती सांभाजीरानगर – रांजगाव शेणपुंजी रोडवरील इंद्रप्रस्थ कॉलनीजवळ रस्तावर आपसात भांडण  सुरू असल्याने थांबलेल्या स्मार्ट सिटी बसवर दगड मारून काच फोडणाऱ्या विरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना (दि 4) रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  स्मार्ट सीटी बस क्र एमएच 20 ई. एल. 1407  बस वर चालक  गणेश रामराव केजबट, वाहक सलमान हयात पठाण असे  यांची  दुपारी सदारण 1 ते साडेआठ  वाजता ड्युटी असतांना रांजणगाव फाटा येथुन साडेनऊ वाजता बस भरुन मुकुंदवाडी बस डेपो कडे  प्रवाशी घेवुन जात असतांना इंद्रप्रस्थ कॉलनीजवळ तेथे दोघे तीघे व्यक्ति आपसात भांडण करीत होते. त्यामुळे रोडवर तेथे नागरीकांची गर्दी जमली होती व रोड सुद्धा जाम झाला होता. त्यावरुन पुढे जाण्याला ट्राफिक जाम झाल्याने  रोडवर बस उभी होती. त्यावेळी अचानक रोडवर भांडण करणारा एक व्यक्ति  हा हातात दगड घेवुन बस कडे आला व त्याने बसच्या समोरील काचेवर त्याच्या हातातील दगड मारून  त्यात बसची समोरील काच पुर्ण पणे फुटली. चालक वाहक हे दोघेही त्यांना समाजावुन सांगुन तो ऐकत नसल्याने व त्या व्यक्तीला रोडवरील लोकांना सुद्धा शिवीगाळ करु लागल्याने काही नागरीकांनी मिळुन त्याला हाताचापटाने व हातातील डब्याने मारहाण केली त्यावरुन सलमान पठाण यांनी 112 या पोलीस हेल्पलाईन क्रमांकावर फोन करुन घडला प्रकार सांगीतला असता तेथे तात्काळ पोलीस आले तेव्हा पोलीसांनी नागरीकांच्या तावडीतुन सोडवुन बाजुला घेतले व त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव अमोल उर्फ प्रशांत बाळकृष्ण शेवनकर वय 21वर्ष, व्यवसाय मजुरी, रा. हरीओम नगर, रांजणगाव, ता. गंगापुर जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे सांगीतले. या प्रकरणी चालक गणेश रामराव केजबट याच्या फिर्यादिवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आला असून पुढील तपास पोलिस अमालदार  वाडेकर हे करीत आहे.

.. ————————–

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

A mina de ouro inexplorada de Mostbet site oficial que praticamente ninguém conhece

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!