July 20, 2024
Home » डोणगावकर विद्यालयाचेआंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत यश

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –
वाळूज महानगर : महात्मा गांधी जयंती निमित्ताने गुजराती विद्यालय छत्रपती संभाजीनगर आयोजित आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर उच्च माध्यमिक विद्यालय रांजणगाव पोळ शाळेच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले.
या स्पर्धेत शाळेच्या आठवी वर्गातील विद्यार्थिनी प्रांजल संदीप जाधव व नववी वर्गातील विद्यार्थी
कार्तिक किसन कु-हाडे याने “होय! मी आहे उद्याच्या आदर्श भारताचा शिल्पकार. !” या विषयावर वकृत्व स्पर्धेत ग्रामीण भागातून प्रथम पारितोषिक मिळवले. तसेच शाळेसाठी सर्वोत्तम सांघिक चषक प्रथम क्रमांक,वैयक्तिक सादरीकरण द्वितीय व तृतीय क्रमांक, शाळेसाठी सर्वोत्तम विषय मांडणी प्रथम क्रमांक,लक्षवेधक वक्ता. इत्यादी पारितोषिके शाळेने पटकावले महात्मा गांधी जयंती निमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे,उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर व इतर मान्यवरांच्या हस्ते शाळेचे विद्यार्थी प्रांजल संदीप जाधव व कार्तिक किसन कु-हाडे यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र,रोख बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल
संस्थेचे मार्गदर्शक कृष्णा पाटील डोणगावकर, अध्यक्ष इंदुमतीताई डोणगावकर, सचिव ॲड.देवयानीताई डोणगावकर,
शालेय समिती अध्यक्ष शिवाजी बोडखे, मुख्याध्यापक सुधाकर थोरात प्रशासकीय अधिकारी संतोष मल्लनाथ यांच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.


Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!