July 21, 2024
Home » तुमने हमसे से पंगा लिया है, एक एक करके सबको तोड के मारेंगे; रस्त्याच्या वादातून महिलांना मारहाण…

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर – वाळूज महानगरातील वडगाव कोल्हाटी येथे पंचगंगा या सोसायटीमध्ये रस्त्याच्या वादातून मारहाण झाल्याची घटना दि २ रोजी रात्री ११ वाजेच्या दरम्यान घडली घडली आहे. या घटनेत महिलांना मारहाण झाली आहे. महिलांवर उपचार सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वाळूज महानगरातील पंचगंगा सोसायटीमध्ये रत्यावरून हा वाद झाला, या प्रकारची पोलिसांना माहिती मिळताच दोन पोलीस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहचले परंतु जमाव मोठा असल्याने ते मारहाण रोखू शकले नाही, अधिकारी यांनी घटनास्थळी येऊन नागरिकांना शांत करून तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलावले परंतु वैद्यकीय रिपोर्ट येईपर्यंत गुन्हा दाखल होणार नसल्याचे पोलिसांनी नागरिकांना सांगितले, दहशदीखाली असलेल्या महिला मुले व नागरिकांनी रात्रभर पोलीस ठाण्यातच ठिया मांडला. मारहाण करणाऱ्यांना प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.परंतु या घटनेमुळे पोलीस ठाण्यात बराच गोंधळ निर्माण झाला होता. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

बीजेपी पक्षाचा कार्यकर्ता असल्याने पोलिसांवर दबाव

मारहाण करणारा हा बीजेपी पक्षाचा कार्यकर्ता असल्याने आमचा गुन्हा नोंद होत नसल्याचा आरोप तेथील नागरिकांनी केला. आम्हाला पोलीस ठाण्यातून हाकलून दिले जात आहे आणि आरोपीला पोलीस ठाण्यात चांगली वागणूक पोलिसांकडून मिळत आहे अशीही चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!