July 18, 2024
Home » सत्तेची मस्ती आलेले लोकांची मस्ती आम्ही जिरवू; महिलांना मारहाणी प्रकरणामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक….

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा

वाळूज महानगर : वाळूज महानगरातील पंचगंगा या सोसायटीमध्ये रस्त्याच्या झालेल्या वादातून महिलांना मारहाण झाल्याची घटना दि.२ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला असून यामध्ये कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांसह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचगंगा या सोसायटीचे जागेतुन रोडचे बांधकाम सुरु असल्याने सोसायटीतील लोकांना येणे जाणे करिता अडथळा निर्माण होत आहे. दौलतखान पठाण याने रस्ता बनविण्यासाठी आणलेले मुरुम व डब्बर आमचे सोसायटीचे जागेत आणुन टाकले असल्याने सोसायटीतील नागरीक मुरूम डब्बर काढून टाकल्याने रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दौलतखान पठाण त्याचेसह तानेवाईक सोसायटीत आले. व जोरजोरात ओरडुन, आरडाओरडा करुन शिवीगाळ करीत होते. त्यावरुन सोसयाटीतील सर्व नागरीक घराबाहेर आले व त्यांना शिवीगाळ करण्याचे कारण विचारले असता दौलतखान पठाण याने काहीएक ऐकुन न घेता आमचे सोसायटीतील महिलांना अश्लील भाषेत शिवीगाळ करुन हाताचापटाने मारहाण करण्यास सुरुवात केली त्यावर सोडवण्यासाठी आलेल्या महिलांना दौलतखान यांचा मुलगा आमेर खान याने फिर्यादी महिला व तिच्या मुलीला हाताचापटाने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपी दोन महिलांनी महिलांचे केस ओडुन हाताचापटाने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच तुमच्याने आमचे काही वाकडे होवु शकत नाही, आम्ही तुम्हाला पाहुन घेवु अशी धमकी दिली. त्यानंतर सोसायटीतील इतर लोकांनी आम्हाला त्याचे पासुन सोडविले. व सदर ठिकाणी लोक जमा झाल्याने वर नमुद इसम हे सदर ठिकाणाहुन निघुन गेले. या प्रकरणी दोन महिलांसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

सत्तेची मस्ती आलेले लोकांची मस्ती आम्ही जिरवू – सचिन गरड (ठाकरे गट)
झालेली घटना बजाजनगरातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना कळताच सचिन गरड हे घटनास्थळी कार्यकर्त्यांसह जाऊन घाबरलेल्या नागरिकांना विश्वास दिला व सत्तेची मस्ती आलेल्या लोकांची आम्ही मस्ती जिरवू असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!