July 26, 2024
Home » धर्मवीर संभाजी प्राथमिक विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

छत्रपती संभाजीनगर : धर्मवीर संभाजी प्राथमिक विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने वक्त्या श्रीमती देशपांडे मॅडम यांनी महात्मा गांधी यांच्या जन्मापासून ते राजकीय कारकीर्दीचा त्यांच्या जीवनातील पाच मूल्यांची ओळख दक्षिण आफ्रिकेतील घटनांचा इतिहास सांगितला तसेच शैक्षणिक धोरण त्यातील महत्त्वाची उद्दिष्ट सांगितली .

दुसऱ्या वक्त्या श्रीमती साबळे मॅडम यांनी लाल बहादूर शास्त्री यांच्या राजकीय कारकीर्द स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वपूर्ण घटना सहभाग इतिहास सांगितला. मंगळवार दि.३ ऑक्टोबर २०२३रोजी या निमित्ताने इ.१ली ते ४थी वर्गाची स्वच्छता उपक्रमात विद्यार्थ्यांच्या १) स्वच्छ दात स्पर्धा, २) स्वच्छ रुमाल स्पर्धा, ३) स्व्च्छ नीट नेटके दप्तर स्पर्धा ४) स्वच्छ कंगवा स्पर्धा ५) स्वच्छ काळे बूट सॉक्स स्पर्धा घेण्यात येणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका, श्रीमती स्मिता खोतकर मॅडम यांनी सत्य,अहिंसा आणि श्रम प्रतिष्ठा या दोन्हीही थोर नेत्यांमधील गुणांची ओळख करून दिली. या कार्यक्रमाचे संचलन श्रीमती तारा लहाने मॅडम यांनी केले तर श्रीमती कांबळे मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले. मुख्याध्यापिका श्रीमती स्मिता खोतकर मॅडम तसेच सर्व शिक्षकांनी या कार्यक्रमास सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!