July 20, 2024
Home » वाळूज महानगर परिसरातून सायकल चोरी करणाऱ्या एका आरोपीसह २० सायकली जप्त; वाळूज एमआयडीसी पोलिसांची कारवाई…

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरातून सायकली चोरी करणाऱ्या एका आरोपीला वाळूज एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून एकूण १ लाख ९ हजार ८०० रुपयाच्या २० सायकली जप्त करण्यात आल्या आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंगाधर भिकाजी कुबेर रा माऊली नगर गट नंबर १०, यांच्या १३ वर्षच्या मुलाची ७ हजार ८०० रू किमतीची पॉपस्टार व्हिक्टरी ही सायकल दि १६ सप्टेंबर रोजी घरासमोरून अज्ञात व्यतीने चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले, घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल होती. तपास सुरु असताना पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे यांना माहिती गोपनीय मिळाली की एक व्यक्ती साजापूर येथे सायकल विक्रीसाठी आला असून यापीर्वी त्याने अनेक सायकली विकल्या आहे. पोलिसांनी सापळा रचून आरोपी आशिष नंदू कांबळे वय१९, रा सालामुरे नगर वडगाव कोल्हाटी छत्रपती संभाजीनगर, याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता अनेक सायकली साजापूर व इतर परिसरात दिले असल्याचे त्याने कबुली दिली.

या सायकली केल्या जप्त
1)7800/- रु. किं.ची POPSTAR VICTORY कंपनीची रेंजर सायकल जु.वा.कि.अं. ( पो.स्टे.एम. वाळुज गु.र.नं. 808 / 2023 कलम 379 भादवि च्या गुन्हयातील )
2) 5000/- रु कि.ची AVON PASSO EX 06 लाल काळ्या रंगाची सायकल जु.वा.कि.अं.
3) 5000/- रु कि.ची WISER ARPAN लाल रंगाची सायकल जु.वा.कि.अं. 4) 5000/- रु कि.ची WISER ARPAN लाल रंगाची सायकल जु.वा. कि. अं.
5) 5000 /- रु कि.ची HICHER लाल रंगाची सायकल जु.वा.कि.अं.
6) 5000/- रु कि.ची CALMBER 100 BSL काळ्या राखाडी रंगाची सायकल जु.वा. कि. अं. 7) 4000/- रु.. कि.ची NEXT HIRO काळ्या रंगाची सायकल जु.वा.कि.अं.
8) 4000/- रु. कि.ची BELLZA NX 100 राखाडी नारळी रंगाची सायकल जु.वा.कि.अं.
9) 5000/- रु. कि. ची TRIMAXX कंपनीची काळ्या रंगाची सायकल जु.वा. कि.अं.
10) 6000/- रु..कि.ची TCROLTSTEELO कंपनीची हिरव्या काळ्या रंगाची सायकल जु.वा.कि.अं. (11) 5000/- रु. कि. ची BAY MAX LEDER कंपनीची लाल रंगाची सायकल जू.वा. कि. अं.
12) 5000/- रु. कि. ची ACROT M600 PRO कंपनीची काळ्या पिवळ्या रंगाची सायकल जु.वा.कि.अं. 13) 5000/- रु.. कि.ची NEXT HIRO कंपनीची आकाशी रंगाची सायकल जु.वा.कि.अं.
14) 5000/- रु. कि. ची AVON ELEMENT कंपनीची भगव्या रंगाची सायकल जु.वा.कि.अं. 15) 5000/- रु.. कि.ची RUDRA KID कंपनीची काळ्या रंगाची सायकल जु.वा.कि.अं.
16) 5000/- रु.. कि.ची TOPSTAR EADLEES कंपनीची काळ्या रंगाची सायकल जु.वा.कि.अं. 17) 6000/- रु किची AVON कंपनीची राखाडी रंगाची सायकल.

———-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!