July 23, 2024
Home » वंदे भारत एक्सप्रेस चा देखावा पाहण्यासाठी गर्दी

(न्युज मराठवाडा वृत्तसेवा) :वाळूज महानगर / प्रतिनिधी- अनिकेत घोडके

बजाजनगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर कॉलनीमध्ये स्वा. वीर सावरकर युवा गणेश मित्र मंडळातर्फे पर्यावरण पोषक असा इंडस्ट्रियल स्क्रॅपपासून “वंदे भारत एक्सप्रेस वर्क्स ऑफ ग्रीन एनर्जी’ देखाव्याची निर्मिती केली आहे. हा देखावा बघण्यासाठी भाविकांची विशेषता शाळकरी मुलांची मोठी गर्दी होत आहे. हा देखावा प्रत्येक शाळेने मुलांना दाखवावा असे आवाहन गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मधुकर इंदलकर यांनी केले.


स्वातंत्र्यवीर सावरकर युवा गणेश मित्र मंडळाच्यावतीने दरवर्षी विविध देखावे सादर केले जातात. यंदा मंडळाचे सदस्य अनिकेत खांडेकर आणि ऋषी मडके यांच्या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनासाठी व सौर, हायड्रो आणि विंड उर्जेचा वापर वाढवण्याकरिता मंडळाने इंडस्ट्रियल स्क्रॅपपासून मिशन २०३० वंदे भारत एक्सप्रेस वर्क्स ऑन ग्रीन एनर्जी या सुंदर देखाव्याची निर्मिती केली आहे. यामध्ये ट्रेन ग्रीन एनर्जीवर मुंबई आणि रत्नागिरी येथे धावताना दिसत आहे. हा देखावा बघण्यासाठी गर्दी होत आहे. तसेच मंडळातर्फे संगीत खुर्ची, रांगोळी, पाक कला, स्लो सायकल, धावणे, चित्रकला, हस्ताक्षर, डान्स या सारखे अनेक उपक्रम राबविले जातात. यासाठी मंडळाचे पदाधिकारी परिश्रम घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!