July 25, 2024
Home » कायदा, सुव्यवस्थेसाठी वाळुज औद्योगिक परिसरात पोलिसांचे पथसंचलन

न्युज मराठवाडा वृत्तसेवा:वाळुज महानगर

सण, उत्सवांच्या काळात परिसरात कुठलीही अनुचित घटना घडू नये, शांतता, सुव्यवस्था कायम रहावी, या उद्देशाने वाळुज औद्योगिक परिसरात पोलिसांचा नुकताच रुट मार्च काढण्यात आला.


रूटमार्चला एमआयडीसी वाळुज पोलिस स्टेशनपासून सुरुवात झाली. त्यानंतर महाराणाप्रताप चौक, रांजनगांव फाटा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, कमळापूर फाटा, रांजनगांव भाजीमंडई, परत त्याच मार्गे येवून जयभवानीचौक, हायटेक कॉलेज, मोटादेवी चौक, ओयासीस चौक असे मार्गक्रमण करीत परत एमआयडीसी वाळुज पोलीस स्टेशनमध्ये रूट मार्च आला व समारोप करण्यात आला.
    या मध्ये वाळुज एमआयडीसी येथील 02 पोलीस निरीक्षक, 11 पोलीस उप निरीक्षीक, सफौ.24, पोअं.61, एकुण 120 अधिकारी व  अंमलदार तसेच RAF/CRPF कंपनीची तुकटी सह पथसंचलन करण्यात आले. परिसरात गणेश उत्सव काळात सर्वांनी शांतता प्रस्तापीत करण्याचे आव्हान अविनाश आघाव वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!