July 23, 2024
Home » डिजे वापरास मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

(न्युज मराठवाडा वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनी प्रदुषण (नियंत्रण व नियमन) 2000 या कायद्याची अंमलबजावणी व्हावी, तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी गुरुवार  दि.28 पर्यंत डिजे वापरास मनाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जारी केले आहेत.

 सकाळी 6 ते रात्री 10 व रात्री 10 ते सकाळी सहा तसेच शांतता विभाग म्हणून घोषित करण्यात आलेले हॉस्पिटल, शैक्षणिक संस्था, न्यायालये, धार्मिक स्थळे इ. भागात  आवाजाच्या नमूद क्षमतांपेक्षा अधिक पातळी जाऊ नये असे निर्बंध आहेत. त्यात औद्योगिक क्षेत्र  दिवसा 75 डेसिबल्स, रात्री 70 डेसिबल्स, विपणन क्षेत्र दिवसा 65 व रात्री 55, रहिवासी क्षेत्र  दिवसा 55 व रात्री 45 तर शांतता विभाग दिवसा 50 व रात्री 40 डेसिबल्स इतकी आवाज मर्यादा हवी. त्याचे पालन व्हावे, यासाठी व कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी मनाई आदेश जारी करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेशात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!