July 25, 2024
Home » मोठी बातमी! अखेर 17 व्या दिवशी मनोज जरांगेंचं उपोषण मागे; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपोषण सोडलं

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

(जालना): मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात सुरू केलेले उपोषण मनोज जरांगे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्‍वासनानंतर 17 व्या दिवशी मागे घेतले आहे. यावेळी मुख्यंमत्री शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांची देखील उपस्थिती यावेळी पाहायला मिळत आहे. मुख्यंमत्री शिंदे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतलं आहे. 

आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी एक महिन्याचा वेळ जरांगे यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे या काळात आपण आपले आमरण उपोषण देखील मागे घेणार असल्याचे जरांगे म्हणाले होते. मात्र, मुख्यंमत्री शिंदे यांच्या हस्तेच आपण उपोषण मागे घेणार असल्याची त्यांची भूमिका होती. त्यामुळे अखेर मुख्यंमत्री शिंदे अंतरवाली गावात दाखल झाले असून, त्यांनी जरांगे यांच्यासोबत चर्चा करून त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मुख्यंमत्री यांच्या विनंतीनंतर जरांगे यांनी देखील आपलं आमरण उपोषण मागे घेतलं आहे. विशेष म्हणजे आमरण उपोषण मागे घेतलं असले तरीही साखळी उपोषण मात्र सुरूच राहणार असल्याचं जरांगे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहेत. 

यापूर्वी झाला होता दौरा रद्द…

मुख्यमंत्री यांच्या हस्ते आपण उपोषण सोडणार असल्याची भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली होती. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे हे बुधवारी संध्याकाळी पाच वाजता अंतरवाली सराटी गावात जाणार होते. याबाबत, सर्व तयारी देखील झाली होती. मुख्यमंत्र्यांचा दौरा देखील आला होता. मात्र ऐनवेळी शिंदे यांनी आपला दौरा रद्द केला. तसेच पत्रकार परिषद घेऊन आपल्या शिष्टमंडळाची जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याची माहिती दिली. मात्र, अचानक रद्द झालेले या दौऱ्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती.

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

A mina de ouro inexplorada de Mostbet site oficial que praticamente ninguém conhece

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!