July 20, 2024
Home » दोन दुचाकी चोरांसह आठ दुचाकी वाळूज एमआयडीसी पोलिसांकडून जप्त

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरातील विविध ठिकाणाहून दुचाकी चोरी करणाऱ्या दोन दुचाकी चोरट्यांसह अटक करुन त्यांच्याकडून आठ दुचाकीसह एकूण ४ लाख १७ हजाराचा मुद्देमाल वाळूज एमआयडीसी पोलिसांनी जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रांजणगाव शेणपुंजी येथे दोन व्यक्ती हे चोरीची बुलेट विक्री करण्यासाठी येत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला, मिळेल्या माहितीप्रमाणे दोन व्यक्ती बुलेटवर आले असता पोलिसांनी त्यांचावर छापा मारून चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीचे उत्तर दिले. अमित अशोक नागरे रा नेवासा सागर कांतिलाल दळवे, रा गंगापूर असे अटक केलेल्या दोन्ही आरोपींचे नाव आहे. ही कारवाई मनोज लोहिय, पोलीस आयुक्त, मा. पोलीस उप आयुक्त श्री शिलवंत नांदेडकर, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, गणेश ताठे पोलीस निरीक्षक, तसेच विशेष तपास पथकाचे सपोनि गौतम वावळे, पोउपनि दिपक रोठे, पोना /धिरज काबलिये, पोअं. सुरेश भिसे, पो. अं. अविनाश ढगे, पो. अं. यशवंत गोबाडे, पो. अं. सुरज अग्रवाल, पो. अं हनुमान ठोके, पोअं नितिन इनामे, पोअं. सुरेश कचे, पोअं. चालक बाळासाहेब देवबोने, पोअं विठ्ठल शिंगाडे, राजाभाऊ कोल्हे, यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!