July 20, 2024
Home » महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे गंठनी हिसकावले; सिडको वाळूज महानगरातील घटना

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा

वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरमधील जिजाऊ नगरमध्ये दुचाकीवर आलेल्या तीन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे गंठन हिसकावल्याची घटना रविवारी रोजी (दि १० ) सकाळी ६:४५ वाजता घडली. रिता विनोद रुद्रकार ३८, गट नंबर १७०, प्लॉट नंबर १०४ जिजाऊ नगर सिडको वाळूज महानगर १, छत्रपती संभाजीनगर असे महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार विनोद समाधान रुद्रकार हे दोन मुले पत्नीसह सिडको वाळूज महानगर १ मध्ये राहतात, पत्नी रिता रुद्रकर ह्या सकाळी ६:४५ वाजता घरासमोर झाडू मारत असतांना समोरून तीन जण दुचाकीवर आले, दुचाकीचा वेग कमी करून थोडे पुढे जाऊन परत मागे आले अचानक जवळ येऊन रिता यांच्या गळ्यातीन दोन तोळ्याचे गंठन बळजबरीने हिसकावले पसार झाले. आरडाओरड झाल्याने विनोद रुद्रकर हे घरातून बाहेर आले, नागरिक जमा झाले. याप्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चोरट्याचा शोध घेत आहे.

परिसरात भितीचे वातावरण …
भरदिवसा गंठन हिसकावल्याने परिसरातील महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. नेहमी ह्या परिसरात टवाळखोर मुले भरधाव वेगाने गाड्या चालवतात, त्यामुळे पोलिसांनी ह्या परिसरात किमान दोन तीन वेळा तरी गस्त घालावी अशी मागणी तेथील महिला करत आहे.

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!