July 26, 2024
Home » बजाजनगरमधून दुचाकी लंपास; घटना सिसिटीव्ही कॅमेरात कैद…

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )-

वाळूज महानगर : वाळूज महानगरमधील बजाजनगर येथील एस टी कोलनी येथून दुचाकी लंपास केल्याची घटना दि ८ शुक्रवारी रोजी सकाळी उघडकीस आली. ही संपूर्ण घटना सिसिटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

अजय प्रतापसिंह गुळवे रा आर ६/४० एस टी कॉलनी बजाजनगर, हे कुटुंबासह राहतात, नेहमी प्रमाणे त्यांनी आपली यमाह आर १५ एम एच २० डब्लूएफ ०८६१ ही दुचाकी घरासमोर उभी केली. सकाळी त्यांना आपली दुचाकी घरासमोर दिसली नाही, सिसिटीव्ही कॅमेरात बघितले असता दोन चोरट्यांनी दुचाकी लंपास केल्याचे कॅमेरात त्यांना दिसले. या दुचाकीची किंमत १ लाख ८५ इतकी असल्याचे गुळवे यांनी सांगितले, घटनेची माहिती पोलिसांना दिली असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे.

——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!