July 19, 2024
Home » आईच्या शोधात निघालेल्या दहा वर्षीय चिमुकलीवर नराधमाकडून लैंगिक अत्याचार; वाळूज परिसरात खळबळजनक घटना …

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा

वाळूज : वाळूज पोलीस ठाणे हद्दीत एका दहा वर्षीत चिमुकलीवर ४५ वर्षीत व्यक्तीने बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी वाळूज पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. दिलीप वाघिल्या पवार वय अंदाजे ४५ वर्षे असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीची आई ही मनोरुग्ण आहे. नवरा मरण पावल्याने ती तीन मुलीसह वडिलकडेच वाळूज येथे राहते. दि १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास आई घरी आली नाही म्हणून मोठी १० वर्षीय मुलगी राणी ( नाव बदलले आहे ) आईला शोधत असताना आरोपी दिलीप वाघिल्या पवार हा राणीला भेटला त्याने विचारपूस केली तेव्हा मी आईला शोधत असल्याचे राणीने सांगितले, तेव्हा मीही आईला शोधण्यासाठी येतो असे सांगून. रात्री १२ वाजेच्या दरम्यान मनोरुग्ण आईला शोधून घरी परत असतांना जीवे मारण्याची धमकी देत राणीवर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान राणी हिची मावशी वडिलाकडेच आल्याने राणी व्यवस्थित बोलत आणि जेवण करत नसल्याने विचारूस केली असता राणीने मावशीला हा सगळा प्रकार उघडकीस आला. राणीचे आजोबा यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना सगळा प्रकार सांगितला. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात आजोबाच्या फिर्यादीवरून वाळूज पोलीस ठाण्यात कलम ३७६ एबी सह पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ठोले हे करीत आहे.

पोलिसांच्या सतर्कतेने आरोपीचा पसार होण्याचा प्लॅन फसला…

आरोपीला गुन्हा नोंद होत असल्याचे कळताच आरोपी दिलीप पवारने पसार होण्याचे ठरवले, गुप्त बातमीच्या आधारे वाळूज पोलीस ठाण्याचे विशेष शाखा प्रमुख पोलीस उपनिरीक्षक भगवान मुजमुले यांना ही माहिती मिळाली, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ शोध घेत संभाजीनगर रेल्वे स्थानकावरून आरोपीला ताब्यत घेतले. आरोपीचा रेल्वेने मुंबईला पसार होण्याचा प्लॅन होता असा पोलिसांनी सांगितले.

——-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!