July 26, 2024
Home » दोषींवर कारवाई करा… ठाकरे गटाने राज्यपालांची भेट घेऊन दिलं निवेदन

न्युज मराठवाडा वृत्तसेवा: मुंबई

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेला लाठीहल्ला याविषयी शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली आहे.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं, म्हणून निवेदन दिलं. यावेळी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह आमदार अजय चौधरी, सचिन अहिर, सुनील प्रभू आणि इतर नेते उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!