July 21, 2024
Home » वाळूज परिसरातील मराठा समाजाला शांततेत बंद पाळण्याचे पोलिसांचे आवाहन…

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा

वाळूज महानगर : जालना येथे झालेल्या लाठीमारच्या निषेधार्थ सोमवारी दि ४ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठी क्रांती मोर्चाच्या वतीने बंद पुकारण्यात आला आहे. त्या अनुषंगाने सकल मराठा समाजाच्या समन्वयकांची बैठक घेऊन शांततेत बंद पाळण्याचे आवाहन वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी केले आहे.

या पुकारलेल्या बंद मध्ये कंपण्या, अत्यआवश्यक सेवा, वैद्दकियसेवा, मेडीकल, सुरळीत चालू राहतील. असे पदाधिकारी यांनी आश्वासन दिले आहे. या आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून नागरिकांना शांततेत बंद पळण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून होत आहे. या बैठकीला अर्जुन आदमाने, सचिन गरड , गणेश नवले, नितीन देशमुख, विजय सरकटे, उमेश दुधाट, गोरख शेळके, शरद जाधव, आत्माराम आगलावे, आमोल काळे, शरत पवार यांच्यासह आदीं पदाधिकारी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!