July 22, 2024
Home » बजाजनगरात जुगार अड्यावर छापा, दीड लाखाचा मुद्देमाल जप्त, वाळूज एमआयडीसी पोलिसांची कारवाई

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणाऱ्यांवर वाळूज एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली ९ जणांसह १ लाख ४२ हजार ९२० रू मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई दि १ रोजी सायंकाळी करण्यात आली.

प्रताप चौकातील लघाने हॉस्पिटल जवळील असलेल्या देश दारू दुकानाजवळ सार्वजनिक ठिकाणी काही व्यक्ती जुगार खेळत असलेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश अघाव व गणेश ताठे यांच्या मगरदर्शनाखाली गणेश ताठे, पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, पोना धिरज काबलीये, पोअं. सुरेश भिसे, पोअं. योगेश शेळके, पोअं. वाघ, पोअं. यशवंत गोबाडे, पोअं. अग्रवाल, पोअं. राजाभाऊ कोल्हे, पोअं नितीन इनामे यांनी जुगार अड्यावर छापा ९ आरोपीसह उद्देमाल ताब्यात घेण्यात आला. यामध्ये रामेश्वर लक्ष्मण दुडेंयार वय 34 वर्ष धंदा शेती रा. तिसगांव, सचिन शामराव म्हस्के वय 30 रा.साईनगर पंढरपूर ता.जि.छत्रपती , नितीन अर्जुन पवार वय 24 वर्ष धंदा कंपनीतकाम रा. स्वलाजा स्टील, फर्निचर दुकान मालकाचा घरी मुळगाव गेवराई बाशी कारकीन औरंगाबाद , सुरेश रामचंद्र मरकड वय 60 वर्ष बजाजनगर , अमोल भास्कर सरवदे, वय 27 वर्ष, बजाजनगर, जयप्रकाश भद्रप्रकाश पटेल वय 33 वर्ष धंदा बजाजनगर, अशोक लक्ष्मण धनेधर वय 34 बजाजनगर , संदीप भाऊसाहेब थोरात वय 23 वर्ष पंढरपूर, जीवन नगीनदास साळे वय 25 बजाजनगर, यांना ताब्यात घेऊन पोलीस आमलदार सुरेश हरिचंद्र कचे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!