July 26, 2024
Home » कंपनीत १५ लाखाची चोरी; अद्याप गुन्हा दाखल नाही

वाळूज औद्योगिक परिसरातील के-२१८- ३ सेक्टरमधील कंपनीतून १५ लाख रुपये किमतीचे साहित्य चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल नसल्याचे वाळूज एमआयडीसी पोलिसांनी सांगितले.

के सेक्टरमधील ट्विटेक इंडस्ट्रीज या कंपनीतून औषधी व साखर कारखान्यांसाठी आवश्यक असणाऱ्या यंत्रांची निर्मिती केली जाते. गुरुवारी रात्री काम आटोपल्यानंतर कामगार कंपनी बंद करून घरी गेले. दुसऱ्या दिवशी कामावर आलेल्या कामगारांपैकी सर्वप्रथम जगन्नाथ हिवरे यांच्या लक्षात हा प्रकार आला यामध्ये जवळपास ५ लाखांचे साहित्य चोरीला कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, ही घटना सिसिटीव्ही कॅमेरात कैद झाली असून चोरटे चोरी करताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!