July 23, 2024
Home » पती कारागृहात; दिराकडून भावजयीवर बलात्कार, लिंबेजळगाव येथील घटना

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा

वाळूज : वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लिंबेजळगाव येथे दिरानेच भावजयीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात दिराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित पहिलेचा पती हा एका गुन्ह्यामध्ये कारागृहात आहे त्यामुळे लिंबेजळगाव येथे दीर- भावजय सामूहिक रहातात दि १४ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजता भावजयीला उठवून मागील रूम मध्ये येण्यास सांगितले फिर्यादी रूम मध्ये गेले असता आरोपी हा म्हणाला ‘तुम्हारे दुल्हा को मेरे अलावा कोई जामीन नही ले सकता’ असे आमिष दाखवून भावजयी सोबत शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली फिर्यादीने नकार दिला तरीपण आरोपीने जबरीने संभोग केला व त्यानंतर तीन-चार वेळेस आरोपीने जबरीने संभोग केले. दि ३० ऑगस्ट रोजी दुपारी ४ वा. आरोपी दीर हा भावजयीच्या दुसऱ्या घरी औरंगाबाद येथे घरात येऊन आरोपीने अंगावरील कपडे काढून झटपट करून भावजयीला जबरीने संभोग करण्याचा प्रयत्न केला जोरा जोराने आरडाओरडा केला म्हणून दीर तेथून निघून गेला. तरी पीडित महिलेवर वारंवार जबरीने बलात्कार करून मुले व पती जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून वाळूज पोलीस ठाण्यात दि ३१ रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम.जी.केदार हे करीत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!