July 26, 2024
Home » ‘ताई मला माफ कर’ असे लिहून ठेवत रक्षाबंधनाच्या दिवशीच बहिणीच्याच घरी भावाची आत्महत्य ; छत्रपती नगर येथील घटना

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) :

वाळूज महानगर : बजाजनगरातील छत्रपती नगरमध्ये बहिणीच्या घरी राहत असलेल्या ३० वर्षीय भावाने गळफास घेऊन आपले जीवन संपवले, ऐन रक्षाबंधनाच्याच दिवशी भावाने फाशी घेतल्याचे दिसताच बहिणीने एकच आक्रोश केला. आकाश सर्जेराव शिंदे ३०, मूळ गाव खैरका पोस्ट बोमनाळी ता मुखेड जि नांदेड असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या महिनीनुसार गोविंद संभाजी गोंधळे व सुनंदा गोविंद गोंधळे हे पती पत्नी महादेव वाघमारे यांचा छत्रपती नगर बजाजनगर मधील रुममध्ये भाड्याने राहतात, सुनंदा यांचा भाऊ सुध्दा बहिणीसोबत राहत होता. हे तिघेही खाजगी कंपनीमध्ये काम करतात आज रक्षा बंधन भाऊ घरीच होता तर दोघे पती पत्नी हे कंपनीत कामाला गेलेले होते, बहीण सुनंदा यांची सुट्टी झाल्याने त्या दुपारी साडेतीन वाजता घरी आल्या, बराच वेळ दरवाजा वाजवून भाऊ दरवाजा उघडत नसल्याने खिडकीतून आवाज देण्यासाठी बाहेरुन खिडकी उघडली, भावाने गळफास घेतल्याचे बघताच बहिणीने मोठा आक्रोश केला, शेजारील नागरिक जमा झाले. खूप दिवसापासून भाऊ लग्नाचा विचार करत होता, त्यात तीन वर्षापूर्वी वडिलाचे निधन झाले, त्यामुळे मी खूप तणावात होता असे बहिणीचे म्हणणे आहे ताई मला माफ करा असे लिहून ठेवत त्याने जीवन संपवले,घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन पागोटे, आमलदार युसूफ शेख किशोर गाडे, स्वप्नील अवसरमल, गणेश सागरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मनोज जैन व नागरिकांच्या मदतीने मृतदेह घाटी दवाखान्यात पाठवला, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!