July 20, 2024
Home » दिवसभरात तिघांनी गळफास घेऊन जीवन संपवले; वाळूज महानगरातील घटना

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा

वाळूज महानगर : वाळूज महानगरात आज दिनांक ३० रोजी दिवसभरात वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याची घटना घडल्या आहे.

बजाजनगरमधील आर एक्स ९/१ हरसिंग भागुसिंग जाधव यांच्या एका रुममध्ये आदित्य दिपक पवार, साहिल मंगलसिंग बोरसे व मयत रोहन रमेश भिसे १८, हे दोन महिन्यापासून राहतात, हे दिघेही एका खाजगी कंपनीत काम करतात आज रोहन ने कॉलेज चे काम असल्याचे सांगून सुट्टी मारली सायंकाळी ६ वाजता हे दोघे घरी आले तेव्हा रोहन दरवाजा उघडत नवता खिडकीतून बघितले रोहन ने गळफास घेतल्याचे लक्षात आहे रोहन हा मूळ प्रवरानगर रोड, लोहगाव अहमदनगर येथील असून त्याने हे टोकच पाऊल का उचललं हे कळू शकल नाही.
तसेच वडगाव कोल्हाटीमधील छत्रपती नगर येथील लग्न होत नाही म्हणून नैराशयात असलेल्या आकाश सर्जेराव शिंदे ३०, मूळ गाव खैरका पोस्ट बोमनाळी ता मुखेड जि नांदेड असे गळफास घेऊन जीवन संपवले. तर वडगाव कोल्हाटी येथील सावित्रीबाई फुले नगर मधील सुधीर भानुदास कीर्तीकर वय २१ यांनी सकाळी आत्महत्या करुन जीवन संपवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!