July 23, 2024
Home » सामान्य नागरिकांकडून पैसे उखळणाऱ्या तलाठ्याची तत्काळ बदली करा, कसोडा ग्रामपंचायतची मागणी

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : तलाठी सजा कसोडा (ता गंगापूर ) येथील सजेवरील कार्यकाळ संपलेल्या तलाठी फेरफार करण्यासाठी सामान्य नागरिकांकडून पैसे उखळणे, मनमानी करणे अशा विविध आरोप करत तलाठी यांची तत्काळ बदली करण्याची मागणी कसोडा ग्रामपंच्यातच्या वतीने उपविभागीय आयुक्त कार्यालय वैजापूर येथे करण्यात आली आहे.

अर्जामध्ये असे लिहले आहे की, तलाठी सजा कासोडा ता. गंगापूर येथील तलाठी हे मनमानी कारभार करत आहे व वेळोवेळी सजेवर हजर राहत नाही. तसेच गौण उत्खन्न करणाऱ्यांना पाठबळ देत आहे. तसेच सामान्य नागरीकांचे फेरफार आल्यास त्यांना पैशाची मागणी करतात व पैशे दिले नाही तर कोणतेही काम करत नाही व उडवा उडवीचे उत्तरे देतात तसेच त्यांचे या सजेवरील कार्यकाळ संपल्यामुळे व सजेवर जास्त वेळे झाल्यामुळे त्यांचे काही लोकांशी आर्थीक संबंध चांगले झालेले आहे. त्यामुळे गरीब शेतकऱ्यांचे कुठलेही महसुल विषयीचे काम ते करत नाही तसे काही काम करयचे असेल तर त्यांचे जवळचे असलेले दलाला मार्फत करावे लागते. तसेच कोणाचेही नविन खरेदीखत झाल्यास त्याच्या फेरफारसाठी अर्ज केल्यास तलाठी साहेब हे समोरील व्यक्तीला फेरफार रोखण्यासाठी अर्ज करून पैशाची मागणी करायला लावतात त्यामुळे सामान्य लोकांचे खुप मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. वरील सर्व करणांमुळे तलाठी साहेब यांची तात्काळ बदली करून तेथे नविन तलठीची लवकरात लवकर नेमणुक करण्यात यावी ही नम्र ग्रामपंचायत कार्यालय कसोडा च्या वतीने करण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!