July 23, 2024
Home » पोलीस आमलदार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस आमलदार एका प्रकरणात लाच मागितल्या प्रकरणी आज दिनांक २७ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.

संतोष गिरजाराम वाघ वय ४६ असे लाच मागणाऱ्या आमदाराचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार बाऊन्स प्रकरणी मा न्यायालय औरंगाबाद येथे कलम 138 नुसार दावा दाखल केलेला आहे सदर दाव्या मध्ये न्यायालया ने काढलेले समन्स प्रतिवादी यांना तमील करून मा न्यायालयास तामिल रिपोर्ट सादर करण्यासाठी नमूद आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडे दोन हजार रुपयांची मागणी करून यापूर्वीच ५०० रू. स्वीकारले होते. आज दि.27 रोजी पंच साक्षीदार समक्ष प्रत्यक्ष तक्रारदार यांचेशी समन्स तामिल बाबत बोलणी करुन १५०० रुपये लाच मागणी केली आहे. व यांना संशय आल्याने लाचेची रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. आलोसे यास ताब्यात घेतले असून MIDC वाळूज पोलिस स्टेशन, औरगाबाद शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कारवाई सापळा अधिकारी –
ही कारवाई सापळा पथक – पोहे का रवींद्र काळे, पोलिस अमलदर विलास चव्हाण , चा पो.शि. चांगदेव बागुल यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!