July 26, 2024
Home » ‘ त्याच ‘ पोलीस उपनिरीक्षकाने वाचविले महिलेचे प्राण; महिलेच्या कुटूंबियांनी मानले अधिकाऱ्याचे आभार…

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : ( संदीप लोखंडे)

वाळूज महानगर : रागाच्या भरात तिसगाव परिसरातील खवडा डोंगरावर उडी मारून आत्महत्य करायला गेलेल्या महिलेची वाळूज एमआयडीसी पोलिसांनी प्राण वाचवले. ही घटना आज दिनांक २५ रोजी सकाळी १० च्या सुमारास घडली.

मिळाल्या माहितीनुसार डायल ११२ वर पोलिसांना माहिती मिळाली की, एक एकटी महिला ही खवडा डोंगरावरून उडी मारून आत्महत्य करण्याच्या तयारीत दिसते, घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, आमलदार विनोद नितनवरे, किशोर गाडे, धीरज काबलिये यांना घटनास्थळी पाठवले, महिलेची समजूत काढत तिला पोलीस ठाण्यात आणले गेले. पोलिसांनी आत्महत्येचे कारण विचारले असता
काही दिवसांपूर्वी लग्न तिचे झाले आहे व तिला पती ऐवजी प्रियकरासोबत रहायचे आहे परंतु आईवडील ऐकत नसल्याने रागाच्या भरात ती आत्महत्यचे निर्णय घेतला असल्याचा तिने सांगितले . पोलीस निरीक्षक यांनी दोघांच्याही आईवडिलांना बोलवून घेत समजुत काढली.

तो पोलीस उपनिरीक्षक चांगला असल्याच्या प्रतिक्रिया त्या तरुणीच्या कुटूंबियांनी व्यक्त केल्या आहे. एका प्रकरणात या पोलीस उपनिरीक्षकावर ठपका ठेवण्यात आला होता, पण आजच्या घटनेवरून ते वाईट नाही अशी चर्चा सर्वत्र होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!