July 20, 2024
Home » वडगाव कोल्हाटी येथे एकास मारहाण

(न्युज मराठवाडा वृत्तसेवा) :वाळूज महानगर-

एका ६४ वर्षीय इसमास किरकोळ करणावरून शिवीगाळ करीत दगड डोक्यात मारल्याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रमोद दिक्षित यांचे छत्रपती कृष्ण हाईट वडगाव कोल्हाटी येथे वाटर सप्लायचे दुकान आहे. सोमवारी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास बाजुच्या गल्लीत राहणारा बबलु उर्फ अभिजीत हा पाणी भरण्यासाठी दुकानात आला होता. त्यानंतर त्यास प्रमोद यांनी पैसे मागितले अशात त्याने वाद घालत शिवीगाळ करण्यास सुरवात केली. त्यानंतर बबलु याचे वडील तेथे आले व त्यास तेथून घेऊन गेले. त्यानंतर पुन्हा थोड्या वेळाने बबलु दुकानावर येत दगड मारले. त्यात प्रमोद यांना दगड लागल्याने डोक्याला दुखापत झाल्याने तो पळून गेला. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहे.


Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!