July 25, 2024
Home » भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने कामगाराला जोरात धडक; कामगार जागीच ठार

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा

वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगाव शे येथे ट्रक – दुचाकी अपघातात एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला असून ही घटना आज दि २० रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.

विलास तात्याभाऊ गायकवाड वय ४८, रा देवगिरी कॉलनी रांजणगाव शेणपूजी, गंगापूर, संभाजीनगर असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रांजनगाव शेपू येथून जोगेश्वरीकडे जात असतांना बाळकृष्ण पेट्रोल पंप समोरील रोडवर एकता नगर येथे पाठीमागून आलेला एम पी ०९ एच जी ५७५१ ट्रकने जोरात धडक दिली, हा अपघात येवढा भयानक होता की विलास गायकवाड यांचा जागेवर मृत्यू झाला, जखमीस विजय कीर्तीकर व अमोल हिवराळे यांनी घाटी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. घटस्थळावरून पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!