July 26, 2024
Home » बस आयशरचा समोरासमोर भीषण अपघात, बसचालकासह बसमधील प्रवासी गंभीर जखमी.

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा

गंगापूर प्रतिनिधी : गंगापूर छत्रपती संभाजीनगर ( Sambhajy) मार्गावर बस व आयशरचा बाबरगाव फाट्याजवळ शुक्रवार रोजी सायंकाळी सात वाजेदरम्यान समोरासमोर भीषण अपघात होऊन अपघातात बसचालक गंभीर जखमी झाला असून बसमधील पंचवीस प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की वाळूजवरून भरधाव मुंबईच्या दिशेने जाणारा आयशर क्रमांक MH ०४ GR 5847 व गंगापूर आगारातुन प्रवाश्यांना छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने घेऊन जाणारी भरधाव बस क्रमांक एम एच 20 बी एल 3846 यांचा गंगापूर छत्रपती संभाजीनगर मार्गावर बाबरगाव फाट्याजवळ समोरासमोर भीषण अपघात झाला आहे.या अपघातात बसचालक राजेंद्र खाडे गंभीर जखमी झाले असून आयशर चालक,क्लिनर व बसमधील २५ प्रवासी जखमी झाले आहे. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ, अनंता कुमावत यांनी जखमींना उपचारासाठी गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.अपघातातील गंभीर जखमींना प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे.अपघातातील जखमी रुग्णांना उपचारासाठी नेण्यास राम नावंदर भूषण हिवाळे,बाबा शेख, परवेज पठाण,अतिश टेमकर,इम्रान शेख, आकाश अमराव,कैलास खाजेकर, सुलतान शेख, अजय कुमावत, प्रतीक सोनवणे, शुभम वाघमारे,संदीप सातपुते यांनी मदत कार्य केले.हा अपघात एवढा भीषण होता की अपघातात बसच्या समोरील भागाचा चक्का चूर झाला होता.

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

A mina de ouro inexplorada de Mostbet site oficial que praticamente ninguém conhece

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!