July 18, 2024
Home » चार वर्षाच्या चिमुकलीवर ३५ वर्षीय नराधमाकडून बलात्कार; वाळूज परिसरातील धक्कादायक प्रकार

न्यूज मराठवा वृत्तसेवा

वाळूज महानगर : वाळूज पंढरपूर येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे, एका ४ वर्षीयी चिमुकलीचे अपहरण करुन ३५ वर्षीय व्यक्तीने बलात्कार केला आहे ही घटना दि १७ रोजी रात्री ९ वाजेच्या दरम्यान घडली आहे. संभाजी होनाजी धवारे वय 35 वर्षे. असे आरोपीचे नाव संभाजी होनाजी धवारे असून तो सुरक्षारक्षकाचे काम करतो, रा. सारा विहार,वाळूज, मूळ रा. दैठण, ता. गेवराई जि. बीड येथील रहिवासी आहे. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक स्वाती उचित,मपोअ प्रियांका तालवंदे, पोअ मातलबे, साळवे, सोहळे, इनामे, अविनाश ढगे, इतर अधिकाऱ्यांनी आरोपीचा शोध घेऊन आरोपीला ताब्यात घेतले, या प्रकरणी आरोपीविरोधात 363,376AB भादंवि सह कलम 4,8,12 पॉस्को कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन पागोटे हे करीत आहे.

घटनास्थळी पोलीस आयुक्तांची भेट
पंढरपूर येथील घटनेचे गांभीर्य बघता पोलीस आयुक्त यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली यावेळी त्याच्यासोबत पोलीस उपयुक्त चिलवंत नांदेडकर, सहायक पोलीस आयुक्त अशोक थोरात पोलीस निरीक्षक अविनाश अघाव होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!