July 23, 2024
Home » तीस हजारासाठी डोळ्यात मिरचीपुड टाकून काढला पळ काढणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल…

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा

वाळूज महानगर – वाळूज परिसरातील बजाजनगर येथे ३० हजार रुपये खात्यात ट्रान्सफर करुन घेत पैसे न देता डोळ्यात मिरची पावडर फेकून पळ काढला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
प्रविण तान्हाजी सरडे, वय-34 वर्षे, रा. RM/123 कोलगेट चौक, बजाजनगर ता. यांचे कोलगेट चौक येथे फ्रेन्ड्स कॉर्नर नावाचे मल्टी सर्विसेस दुकान आहे दि 17 रोजी दु साडेबारा वाजेच्या सुमारास नंदकिशोर शंकरराव देशमुख हा नेहमी दुकानावर आला व मला ३० हजार रुपये अकाऊंटला ट्रान्सफर करायचे आहे असे सांगितलं व दिलेल्या एक अकाऊंट नंबरवर सरडे यांनी मनी ट्रान्सफर चे चार्जेसचे पैसे कमी करुन 29,700/- रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर नंदकिशोर शंकरराव देशमुख यास भी ट्रान्सफर केलेल्या 30,000/- रुपयाची मागणी केली तेव्हा नंदकिशोर शंकरराव देशमुख याने पैसे देण्याएवजी त्याचे खिश्यातुन एक मिर्ची पावडरचे पाकिट खिश्यातुन काढुन ते फाडुन सरडे यांच्या तोंडावर फेकली व तो पळुन गेला तेथील आरडाओरडा केली तेव्हा माझे दुकानासमोरील लोकांनी नंदकिशोर शंकरराव देशमुख यास अंकुश बोबडे, मधुकर देशमुख , केशव पाटील यांनी पकडले व जमलेले लोकांनापैकी कोणीतरी पोलीसांना फोन केल्याने दुकानासमोर पोलीसाची गाडी आली व पोलीसांनी नंदकिशोर शंकरराव देशमुख ला पोलीसाच्या गाडी मध्ये पोलीस स्टेशनला घेवुन आले. नंतर नंदकिशोर शंकरराव देशमुख च्या भावाने माझे घेतलेले पैसे परत दिले आहे. या प्रकरणी कलम ३९३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!