July 23, 2024
Home » अवैध गॅस रिफिलिंग अड्यावर छापा; तीन आरोपींसह ५२ लाख ६८ हजाराचा मुद्देमाल जप्त

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा

वाळूज महानगर : बेकायदेशीररित्या विनापरवाना एचपी गॅस टँकरमधील एलपीजी गॅस व्यवसायिक सिलेंडरमध्ये चोरून भरत असताना सातारा पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली ही कारवाई दि १६ रोजी करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जावेदखान मोहम्मद मुनाफ, वडाळा, मुंबई, शेख अफसर शेख बाबुमियाँ, वय 35 वर्षे, राजेंद्रनगर, नारेगाव, छत्रपती संभाजीनगर,कदीर शेख अब्दुल रज्जाक, बायजीपुरा, छत्रपती संभाजीनगर असे तिन्ही आरोपींचे नाव असून सर्व मिळून ५२ लाख ६८ हजार ८३३ रू. चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.ही कारवाई सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, श्री. मनोज लोहीया भापोसे साहेब, प्रभारी अधिकारी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 2 – अपर्णा गिते, साहेब, सहाय्यक पोलीस आयुक्त, उस्मानपुरा विभाग, श्री. डॉ. रणजीत पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत भा. पोतदार, सपोनि. विनायक शेळके, पोउपनि देवीदास शेवाळे, पोउपनि, भंडारे, पोह/439 सुनिल धुळे, पोना/ 202, चव्हाण, पोशि/2293 दीपक शिंदे, पोशि/ 2546 सुनिल पवार, पोशि/ 131 अजित लोंढे, पोशि/519, अनिल राठोड, पोशि/2239, मुरमुरे, पोशि/ 2467 अभय भालेराव, चालक पोना / 1216, राऊत यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास सपोनि. विनायक शेळके हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!