July 23, 2024
Home » प्रा डॉ संजय सांभाळकर यांना डॉ शंकरराव चव्हाण गुरुरत्न पुरस्कार प्रदान

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा
संभाजीनगर : नांदेड येथे शंकरराव चव्हाण गुरुरत्न पुरस्कार सोहळा दि १५ रोजी पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात प्रा डॉ संजय सांभाळकर यांना नांदेड जिल्हाचे जिल्हाधिकारी मा अभिजित राऊत व सद्गुरू सदानंद स्वामी महाराज यांच्या हस्ते डॉ शंकरराव चव्हाण गुरूरत्न पुरस्कार अंतर्गत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्यरत्न पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला. मीमांसा फाऊंडेशन, दैनिक समीक्षा, मंथन क्रियेटीव्ह, ह्युमन राईट्स फाऊंडेशन, मीडिया पोलीस सोशल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने 15 वर्षापासून दिला जाणारा हा पुरस्कार दगडोजीराव देशमुख महाविद्यालय वाळूज संभाजीनगर (औरंगाबाद) येथील उपप्राचार्य प्रा.डॉ संजय सांभाळकर यांना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रदान करण्यात आला. नुकताच रिअल इंडो ग्लोबल व्हिजन गुरुकुल फाऊंडेशन धुळे यांच्या मार्फत दिला जाणारा मे 2023 चा राष्ट्रीय शिक्षा रत्न पुरस्कार सुद्धा डॉ सांभाळकर यांना देण्यात आला. त्यांचे या निमित्त सर्व क्षेत्रातून अभिनंदन केल्या जात आहे.

———

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!