July 22, 2024
Home » रांजनगाव (शेपूं) येथील जबरी चोरी करणारे आरोपी शहर गुन्हे शाखेच्या ताब्यात

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा

संभाजीनगर : रांजणगाव शेणपुंजी येथे दि ८ ऑगस्ट रोजी मंगलमूर्ती ज्वेलर्स येथे भरदिववास १२ लाख ४० हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केले होते. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. ही घटना सिसिटीव्ही कॅमेरात कैद झाली होती, पोलिसांनी त्याचा आधार घेत जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला संभाजीजगर शहर गुन्हे शाखेने अटक करुन गेलेले मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारआरोपींना चाळीसगाव येथून मुंबई पर्यंत पाठलाग करत मुंबईहून अटक केली‌. त्यांना अटक करून त्यांच्याकडून 13 लाख 35 हजार 407 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या आरोपींनी आयुष्य आरामात आयुष्य जगण्यासाठी ज्वेलर्स वर दरोडा टाकल्याचे कबूल केले. योगेश तायडे, निलेश सोनवणे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!