July 26, 2024
Home » पिस्टलचा धाक दाखवून जबरी चोरी करण्याचा उद्देश असलेल्या दोन आरोपीला वाळूज एमआयडीसी पोलिसांनी पकडले

न्युज मराठवाडा वृत्तसेवा

वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरातील चोरडिया पेट्रोल पंप येथे पिस्टलचा धाक दाखवून जबरी चोरी करण्याच्या तय्यारीत असलेले दोन आरोपी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी सकाळी १० वाजेच्या दरम्यान पकडले त्यांच्याकडून एक पिस्टलसह दुचाकी जप्त केली आहे.

रहीम शेख अबू बकर सिद्दीकी, वय 24 वर्ष, रा मिलन मशीद, कमळापुर,ता गंगापुर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, व अरबाज नकीम शेख , वय 18 वर्ष, रा नुराणी मशीद जवळ , दत्तनगर , रांजणगाव ता गंगापुर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे दोन्ही आरोपींचे नाव आहे या दोन्ही आरोपींवर या पूर्वी हदगाव पोलीस ठाणे जि. नांदेड, येथे विविध गंभीर गुन्हे दाखल आहे. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी कसून चौकशी केली असता चौकशी अंती आरोपीकडून जप्त करण्यात आलेली पिस्टल ही नकली असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक अविनाश अघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन पागोटे, पोलीस कर्मचारी राजाराम डावखोरे, लखन दुशिंग, अग्रवाल, यशवंत गोबाडे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!